गडचिरोली
१५ ऑक्टोंबर डॉ. ए. पि. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनी भव्य रक्तदान शिबिर

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,१३ ऑक्टोंबर)संपादक:संदिप कांबळे
स्थानिक गडचिरोली शहरातील वृत्तपत्र विक्रेता पत्रकार संघटने द्वारा दि,१५ ऑक्टोबर २०२३ रोज रविवार ला सकाळी ११ वाजता पञकार भवन धानोरा रोड गडचिरोली येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी इच्छुक रक्तदात्यांनी
अनिल बाळेकरमकर – (अध्यक्ष) 9422738328,लोमेश बांबोळे -(सचिव) 9404795875 यांच्याशी सम्पर्क साधण्याची विनंती करण्यात आली आहे.
तसेच रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमा सोबतच गडचिरोली शहरातील पेपर वाटप करणाऱ्या मुलांना भेटवस्तू म्हणुन (टि शर्ट) वाटप व स्नेह भोजन कार्यक्रम आयोजन केलेले आहे तरी संपुर्ण गडचिरोली जिल्हा संघटनेच्या सदस्यांनी (तालुका स्तरावरील) सुद्धा होणाऱ्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आलेले आहे.
जाहिरात
