जाहिरात
चिमुरनेरी

नेरी ग्रा. प. चे सदस्य बनले मालक आणि जनता झाली लोलक, ग्रा.प. नेरीचे सदस्य बनले ठेकेदार मस्त आणि प्रशासन सुस्त,जनतेची मागणी फस्त.

प्रशासनाचे दुर्लक्ष नागरिकांचा आरोप

Spread the love

प्रतिनिधी- प्रवीण वाघे(दि,२० ऑक्टोंबर)

चिमूर तालुक्यातील नेरी सर्वात मोठी ग्रा. प. असून या गावाची लोकसंख्या १६ हजाराच्या वरची असून गाव तसं चांगलं पण वेशीला टांगला अशी अवस्था दिसून येत आहे. अनेक समस्या च्या विळख्यात गाव सापडला आहे. रस्ते, पाणी ,आरोग्य असल्या अनेक समस्या गावाच्या विकासाला प्रभावित करीत आहेत. परंतु गावाचा कारभार पाहणारी संस्था ग्रा. प. बेजबाबदार पणे कारभार करताना दिसून येत आहे. सदस्य मालक झाले असून जनता लोलक झाली. असल्याचे चित्र दिसत आहे त्यामुळे जनतेच्या मागणी ला केराची टोपली व गाजर दाखवण्यात येत आहे त्यामुळे प्रशासन सुस्त ग्रा प सदस्य ठेकेदार मस्त अशी अवस्था झाली आहे.

नेरी गावातील रस्ते पाऊस पडला की चिखलमय होऊन वाहतुकीचा प्रश्न निर्माण करीत आहेत काही ठिकाणी अरुंद रस्त्यामुळे रहदारीची समस्या निर्माण होत आहे तर अनेक वार्डातील रस्त्यामध्ये पाणी साचून गंदगी निर्माण होत आहे, काही ठिकाणी नाल्या ची व्यवस्था नसल्याने व नाल्या बुजल्याने सांडपाणी ची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे. जिकडे रस्ते हवे तिकडे न देता नफेखोरी च्या नादात मनाला वाटेल तिथे रस्ते निर्माण करणे सुरू आहे. असा अंदाधुंद कारभार सुरू असून सरपंच उपसरपंच एकीकडे सदस्य दुसरीकडे आणि जनता भलतीकडेच दिसत असून ग्रा. प. सदस्यच कारभार चालवताना दिसत आहेत कारण ग्रा. प. सदस्य स्वतः ठेकेदार बनून गावाच्या विकासाची कामे करताना दिसत आहेत अशी बोब जनता ठोकत आहे परंतु याकडे कुणीही लक्ष देत नाही आहे.
नुकतेच पेठ विभागातील वार्ड क्र 1 येथील सिमेंट रस्ता बनविण्यात आला हा रस्ता बनविण्यासाठी ज्या योजनेचा निधी वापरण्यात आला तिथे त्या व्यक्तीचे घरच नाही त्यामुळे अनुसूचित जाती व नवबौध्द योजनेचा दुरूपयोग करण्यात आला याबाबत जनतेनी चौकशी ची मागणी केली असता प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिक बोलत आहेत प्रसारमाध्यमानी याची दखल घेऊन जनतेची मागणी उचलून धरली असता प्रशासनाने साधी चौकशी सुद्धा केली नाही. त्यामुळे ग्रा. प. सदस्य मनमानी कारभार करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत या अश्या अंदाधुंद कारभारामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण होत आहे असे अनेक कामे सदस्यांनी आपल्या मनमौजीनी केले आहेत त्या सर्व कामाची चौकशी करण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे परंतु कमिशन च्या वृत्तीमुळे सर्वजण डोळे मिटून शांत बसले आहेत तेव्हा या ग्रा. प. ला सत्ताधारी कोण आणि विरोधक कोण याचा काहीच पत्ता नाही आवाज उठविला जात नसल्याने हा प्रकार घडत असून ‘तेरी भी चूप मेरी भी चूप माल खाऐंगे गुप चूप गुप चूप सब मिलके साथ रहेंगे और सबका विकास करेंगे’ अशी अवस्था निर्माण झाली आहे अशी चर्चा नागरिक करीत असून प्रशासनाने यात हस्तक्षेप करून चौकशी करावी अशी मागणी जनता करीत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button