जाहिरात
महाराष्ट्रराजकीय

संघ आता विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात!

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली,

आगामी विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले आहे. महायुतीतील सर्वच पक्षांनी आम्हाला गडचिरोली विधानसभा ची तिकीट देण्यात यावी असा दावा केला आहे. मात्र यात नव्याने उडी टाकत आहे तो म्हणजे संघ परिवार संघाच्या माणसाला तिकीट द्या असा आग्र धरून डॉक्टर मिलिंद नरोटे हा चेहरा समोर केला जात आहे. मात्र इतिहासात पहिल्यांदाच जाहीर रित्या संघाच्या माणसाला तिकीट द्या असा प्रचार पहावयास मिळत आहे. संघाने आपला माणूस घोषित केलेला आहे असा चुकीचा प्रसार सध्या संघातील काही निवडक माणसांकडून केला जात आहे, किंवा या माणसाला संघाने आतून आदेश दिले आहेत का असा सवाल देखील आता उपस्थित केला जात आहे. मात्र आजपर्यंत भारतीय जनता पार्टीला आतून संघाचा समर्थन असायचा मात्र आता संघाच्या माणसाला तिकीट द्या आणि भारतीय जनता पार्टीने समर्थन व प्रचार करा असा चुकीचा प्रचार सर्व प्रसार माध्यमांद्वारे केल्या जात आहे. संघाच्या माणसाला भाजपात प्रवेश करून भाजपाची तिकीट द्या असा देखील प्रकार सद्यस्थितीत सुरू झालेला आहे. त्यामुळे आता संघाला राजकारणात उतरावे लागेल आहे काय असा सवाल देखील आता विरोधक करीत आहे.

भारतीय जनता पार्टीत गटबाजी
¶¶
पूर्वी काँग्रेस पक्षात गटबाजी असल्याचे चित्र दिसून येत होते मात्र सध्या स्थितीत भारतीय जनता पार्टीत गटबाजी असल्याचे दिसून येत आहे या गटबाजीकडे हाय कमांड लक्ष देत नसल्याचेही दिसून येत आहे. भारतीय जनता पार्टी हा पक्ष शिस्तबद्ध व विविध धोरणात्मक ध्येय घेऊन काम करणारा पक्ष म्हणून ओळख होती. मात्र सध्या स्थितीत या गटबाजीला थांबवण्यात भाजपा जिल्हाध्यक्ष यांना अपयश आले आहे.त्यामुळे त्यांचे पक्षात वर्चस्व नसल्याचे दिसून येत आहे.

या गंभीर विषयाकडे हाय कमांडचे कोणतेही लक्ष नसल्याचे देखील दिसून येत आहे त्यामुळे सध्या स्थितीत गडचिरोली भारतीय जनता पार्टीत गटबाजी मोठ्या प्रमाणात होत आहे या गटबाजीमुळे लोकसभेला मोठे नुकसान झालेले आहे आता हेच नुकसान विधानसभेला होण्याची शक्यता वर्तविले जात आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठीने देखील या गंभीर विषयाकडे लक्ष देण्याची गरज आहे .

विद्यमान आमदारांसोबत पटत नसल्यामुळे पक्षात नवीन माणसाची एन्ट्री करीत संघाचा माणूस म्हणून खोटा अपप्रचार करण्याचा प्रकार सध्या भारतीय जनता पार्टी तर्फे करण्यात येते आहे मात्र असल्या प्रकारामुळे भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button