जाहिरात
व्हाहाड

सोनापूरात “छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव ‘उत्साहात साजरा

Spread the love

लोकशाही न्युज,व्याहाड (दि,२१ फेब्रुवारी)

सोनापुर येथे दि. १९ फेब्रुवारी २०२३ ला रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती “राजे शिवछत्रपती “मंडळाच्या वतीने साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री . भोंडे आरोग्य सेवक सोनापूर हे प्रमुख अतिथी म्हणून मुकेश भुरसे उपसरपंच ग्रा. पं सोनापूर., कैलास बांबोळे अध्यक्ष म. गां. त. मु. गाव स. सोनापूर,श्रीधर सोनुले अध्यक्ष शा. व्य. स सोनापूर, यशवंत गुरनूले मा. उपसरपंच ग्रा. पं सोनापुर, प्रकाश नागापुरे सदस्य ग्रा. पं सोनापूर ,बंडु बारसागडे सदस्य ग्रा. पं सोनापूर , यशवंत रणदिवे मा. पो. पा.सोनापुर, चंद्रशेखर रणदिवे, कु. स्नेहा गोवर्धन आरोग्य सेविका सोनापुर,कु.वैजयंतीमाला शंभरकर आरोग्य सेविका सोनापुर सदर मान्यवर आणि सोनापूर वाशियजनता उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
त्यानंतर लहान मुलींचे शिवाजी महाराजांच्या गितावर दोन समुह नृत्य सादर करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक यशवंत गुरनूले यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन रोशन गुरनूले यांनी केले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button