जाहिरात
Uncategorizedब्रेकिंग न्युज

पोटेगाव पोलीस स्टेशनचे प्र.पोलीस ठाणेदार गोडसे यांनी केली आदिवासी महिलेला मारहाण, पीडित महिलेची पत्रकार परिषद

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली/पोटेगाव (दि,१२ फेब्रुवारी)

सविस्तर वृत्त,
गडचिरोली मुख्यालयापासून ३५ किलोमीटर दूर अंतरावर असलेल्या पोटेगाव पोलीस स्टेशन मध्ये सदर महिला नाव सौ. माया मंगेश मडावी वय ३४ वर्ष (जात ,प्रधान अनु, जमाती) हिच्यावर अन्याय झाल्याची माहिती आज पत्रकार परिषद घेऊन दिली,पत्रकार परिषदेला तिचा नवरा मंगेश मडावी हजर होता.

 

( पीडित महिला झालेल्या अत्याचाराची माहिती पत्रकार परिषद घेऊन दिली)

माझा पती मंगेशला दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ ला पोलीस स्टेशन पोटेगाव येथे बोलविण्यात आले होते. दीड वर्षा अगोदर मी दारूचा व्यवसाय करीत होती नवऱ्याची तब्येत बरी नसल्याने मी दारूचा व्यवसाय करायची दोन ते तीन लिटर दारू विक्री करून आपली उपजीविका पूर्ण करायची त्यावेळेला सदर ठाणेदाराने पीडित महिला व तिच्या नवऱ्याला ठाण्यात बोलावून त्यावेळेस दारू व्यवसाय करायचा नाही याबाबत सांगितले तेव्हापासून मी दारू विक्री पूर्णता बंद केली होती .

दि.१० फेब्रुवारी २०२३ रोजी सुमारे ११ वाजता चे दरम्यान मी व माझे पती पोलीस स्टेशनला गेले असता ठाणेदाराने अगोदरच लिहून ठेवलेल्या कागदावर मला सह्या करण्यास सांगितले, मी तो वाचून पाहिला त्यावर एका पांढऱ्या रंगाच्या पिशवीत पाच लिटर मोह फुलांची दारू आढळून आल्याचा खोटा बनावटी आरोप सदर कागदावर लिहून असल्याचे दिसले, मी त्या कागदावर सही करण्यास नकार दिला. तेव्हा पोलीस ठाणेदाराने माझ्या पतीस गालावर मारहाण केली तेव्हा मी त्यांना कशाला मारता तुम्ही खोटे केस कशाला माझ्यावर लावता, माझ्या पतीचा अपघात झाला आहे त्यांची तब्येत बरी नाही असे म्हटले पण ठाणेदाराने रागात येऊन मला माझ्या गालावर जोराने मारहाण केली व छातीवर धक्का मारून मला खाली पाडले व मला अश्लील भाषेत शिवीगाळ केले व सायंकाळी परत कागदावर सही घेऊन मला सोडून देण्यात आले मला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ठाणेदारास तात्काळ निलंबित करावे व कठोर कारवाई करावी. अशी मागणी याप्रसंगी पत्रकार परिषदेत पीडित महिलेने केली आहे.

प्र.पोलीस निरीक्षक श्री, गोडसे
पोटेगाव पोलीस स्टेशन

★★★

लोकशाही न्युज ने प्रतिक्रियेसाठी फोन केला असता ठाणेदाराने फोन रिसिव्ह केला नाही …

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button