जाहिरात
गडचिरोली पोलीस

५ मार्च ला भव्य महामॅरेथॉन स्पर्धा, मान्यवरांच्या हस्ते लोगो चे अनावरण

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,८ फेब्रुवारी)

गडचिरोली पोलीस दलातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील आदिवासी तरुण युवक- युवतींना स्पर्धेच्या माध्यमातून एक संधी निर्माण व्हावी, तसेच आदिवासी भागात विकास व्हावा यासाठी सामाजिक बांधीलकीच्या दृष्टीने, दिनांक ५ मार्च २०२३ रोजी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य मॅरेथॉन स्पर्धेच्या लोगोचे अनावरण दि. ६ फेब्रुवारी २०२३ पोलीस अधीक्षक कार्यालय, गडचिरोली येथे पोलीस अधीक्षक, गडचिरोली  नीलोत्पल,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन)  कुमार चिंता , उपविभागीय पोलीस अधीकारी, गडचिरोली प्रणिल गिल्डा यांचे हस्ते करण्यात आले.

या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत, समाजाच्या सर्व स्तरातून आबालवृद्धांच्या सुमारे १०,००० हजार नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. स्पर्धेत वेगवेगळ्या वयोगटासाठी वेगवेगळे अंतर असून विजेत्यांना गौरविण्यात येणार आहे. सहभागी असलेल्या सर्व धावपटूंना किट, टी-शर्ट, मेडल्स, प्रमाणपत्र व विजेत्यांना रोख बक्षीस इ. देण्यात येणार आहे.

स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या जवळच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पोस्टे/उपपोस्टे / पोमकं येथे संपर्क साधावा. या मॅरेथॉन स्पर्धेची नोंदणी मोफत असणार आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button