आमदार डॉ. देवराव होळी यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विकास कामांची अंमलबजावणी व योग्य नियोजन करण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश
लोकशाही न्युज, गडचिरोली (दि.६ जानेवारी)
आज सर्किट हाऊस येथे पार पडलेल्या बैठकीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील विकास कामांसाठी आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये निधी कमी पडू देणार नाही मात्र अधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या कामांची योग्य अंमलबजावणी व नियोजन करावे असे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी या बैठकीला बोलाविलेल्या अधिकाऱ्यांना दिले.
या महत्वपुर्ण बैठकीला जलसंपदा विभाग,जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग ,प्रधानमंत्री/ मुख्यमंत्री ग्राम सडक योजना, या विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता नगरपरिषद, नगरपंचायत चे मुख्याधिकारी , महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता ,पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता , आरोग्य विभागाचे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक, आरोग्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
गडचिरोली विधानसभा क्षेत्रात मागील २०२२-२३ या आर्थिक वर्षी मंजूर झालेल्या कामांची अंमलबजावणी कशाप्रकारे करण्यात आली त्या विकास कामांचा आढावा व सन २०२३-२४ या आर्थिक वर्षी कोणकोणती विकास कामे घेण्यात यावी या संदर्भात या नियोजन बैठकीचे आयोजन आमदार डॉ. देवराव होळी यांनी शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे केले.
