बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या २ महिला ताब्यात,आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

लोकशाही न्युज,गडचिरोली,(दि.४ जानेवारी)
गडचिरोली येथील सुयोग नगर नवेगाव, येथे महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करणाऱ्या २ महिला सौ.मोनिका किशोर खनके व श्रीमती संगीता निंबाळकर यांचे घरावर सहकार विभाग व पोलीस विभागाने संयुक्तरित्या धाड टाकली. यात नियमबाहयरित्या चालणाऱ्या सावकारी व्यवहाराचे कागदपत्रे आढळून आली. ती कागदपत्रे जप्त करुन त्यांच्या विरुध्द सावकारी अधिनियम २०१४ चे कलम १६ अंतर्गत कारवाई केली आहे.
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, तथा सावकारांचे निबंधक गडचिरोली प्रशांत धोटे यांचे आदेशान्वये शासनाकडे बेकायदेशीर अवैध सावकारीच्या अनुषंगाने, दिनांक २०/०१/२०२३ रोजी तक्रारदार यांचेकडून प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार सौ. मोनिका किशोर खनके व श्रीमती संगीता निंबाळकर या महिला बचत गटाच्या नावाखाली अवैध सावकारी करीत असल्याची माहिती मिळाल्याने विक्रमादित्य पितांबर सहारे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, गडचिरोली यांनी सौ. मोनिका किशोर खनके यांचे घरी व पंकज नारायण घोडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था,ता.चामोर्शी यांनी श्रीमती संगीता निबांळकर यांचे घरी एकाच वेळी धाड सत्र राबविण्यात आली.
सौ.मोनिका किशोर खनके यांचे घरी सापडले
आक्षेपार्ह दस्तऐवज,
👇👇
१२ स्टॅम्प पेपर,१२ स्टॅम्प पेपरच्या छायांकित प्रती ७ कोरे धनादेश १ धनादेश बुक, २ साध्या पेपरवर केलेला करारनामा, रकमेच्या नोंदी असलेल्या २१ चिठ्ठया, ३ रजीस्टरची पाने, व १० हिशोबाच्या नोंदवहया, ६ ब्ँक पासबुक, अनेक व्यक्तीच्या नावाने असलेल्या /मतदानकार्ड/ पॅनकार्ड /आधारकार्डांच्या इलेक्ट्रिक बीलांच्या २४ छायांकित प्रती ,विक्री पत्र, मालमत्तापत्र (सेलडिड) तसेच तर आनुषांगीक ३९ कागदपत्रे इत्यादी आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली.
सौ.संगीता निबांळकर यांचे घरी सापडले आक्षेपार्ह दस्तऐवज,
👇👇
६ स्टॅम्प पेपर , २ डायऱ्या, १२ कोरे धनादेश, ३ सात/ बारा नमुने, ५ सेलडिड नमुने, २१ चिठ्ठया, ६ विक्रीपत्र, ५ मालमत्तापत्र (सेलडिड) इत्यादी आक्षेपार्ह कागदपत्रे चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आली.
सदर कागदपत्रांची चौकशीनंतर कायदेशीर कार्यवाही करणार असल्याचे सहाय्यक निबंधक विक्रमादित्य सहारे यांनी सांगितले.
सदर कारवाई पूर्ण होईपर्यंत गडचिरोली पोलीस यांनी सहकार्य केले.
