लोकशाही न्यूज,
सुदर्शन गोवर्धन
व्याहाड सर्कल प्रतिनिधी (दि,१४ डिसेंम्बर)
ग्रामपंचायत सोनापूर व आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर तसेच जनसेवा ग्रामीण विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
सावली तालुक्यातील सोनापूर येथे ग्रामपंचायतीच्या पटांगणात दि.13/12/2022 मंगळवारला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. शिबीराचे उद्घाटन ग्रामपंचायत सोनापुर् येथील सरपंच सौ. जयश्रीताई मडावी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे मुकेश भुरसे उपसरपंच ग्रा. पं सोनापुर ,बंडुजी बारसागडे, प्रकाशजी नागापुरे, आणी सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
शिबिरात बिपी,शुगर, एच बी, कुष्टरोग, हिवताप, क्षयरोग, फ्लोरोसीस, हत्तीरोग, गर्भाशय आजार, ओरल कॅन्सर, ब्रिस्ट कॅन्सर, आदि आजाराची तपासणी करण्यात आली.
रुग्णाची तपासणी करण्यासाठी डॉ. सुधीर साळवे, आरोग्य अधिकारी प्रा. आ. केंद्रव्याहाड बूज, कू.पल्लवी हजारे मॅडम समुदाय आरोग्य अधिकारी, कु. सायली राऊत समुदाय आरोग्य अधिकारी, एस. डी. पाटिल आरोग्य सहायक, शेषराज भांडेकर लॅब तंत्रण्य, तुळशीदास कुनघाटकर आरोग्य कर्मचारी, पी. एच. शेडमाके आरोग्य कर्मचारी (प्रशिक्षणार्थी,)भोंडे आरोग्य सेवक, कोल्हे आरोग्य कर्मचारी(प्रशिक्षणार्थी)
कु. स्नेहा गोवर्धन आ. सेविका, कु. वैजयंतीमाला शंभरकर आ. सेविका, रुपेश किरमे तालुका समनवयक जनसेवा ग्रामीण विकास व प्रतिष्ठान चंद्रपूर, ज्योती गोवर्धन आशा वर्कर, नंदा मेश्राम आशा वर्कर, नवनाथ गुरणुले ग्रा.पं.शिपाई आदींनी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
