जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

तालुका कृषी अधिकाऱ्यासह लिपिक एसीबीच्या सापड्यात, ४० हजार घेणे पडले महागात.

Spread the love

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,८ डिसेंम्बर)
शेतकऱ्यासाठी असलेल्या हार्वेस्टरच्या खरेदीचे अनुदान मंजूर करून दिल्याचा मोबदला म्हणून एका तक्रार दाराकडून ४० हजार रुपयाची लाच घेताना तालुका कृषी अधिकारी व कृषी कार्यालयातील लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या एसीबी पथकाने रंगेहात पकडले.
ही कारवाई बुधवारी संध्याकाळी करण्यात आली
संदीप अशोकराव वैद्य ३३ वर्षे असे लाचखोर लिपिकाचे नाव असून तो जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात लेखा विभागात वरिष्ठ लिपिक आहे त्याने आरमोरी येथील तक्रारदाराकडून ४० हजाराची लाच स्वीकारली त्यातील २० हजार रुपयाचा वाटा स्वीकारताना तालुका कृषी अधिकारी तथा प्रभारी उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप वाहाने ४९ वर्षे यांना रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई एसीबी पथकाने केली आहे.
एसीबी पथकाची या आठवड्यातील ही दुसरी कारवाई आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button