जाहिरात
गडचिरोलीराजकीय

बदनामी करणाऱ्यांना मानहानीची नोटीस व पोलिसांत तक्रार दाखल करणार,आमदार डॉ. देवराव होळी यांची पत्रकारपरिषदेत माहिती

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि,७ डिसेंम्बर)

नागपूर येथील संविधान चौकामध्ये माझ्याविरोधात सुरू असलेले उपोषण आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १५६ (३) अन्वये दखलपात्र गुन्ह्याची पोलिसांनी दखल न घेतल्यास न्यायालयात न्याय दाद मागण्याचा मार्ग खुला असतानाही, सत्यता माहीत असल्याने तेथे न जाता प्रसारमाध्यमातून आपली बदनामी करणाऱ्यांवर १ कोटी रुपयांच्या मानहानीची नोटीस बजाविली असून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करणार असल्याची माहिती आमदार डॉ. देवराव होळी यांनी मंगळवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली.

यावेळी पत्रपरिषदेला भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, जिल्हा संघटन महामंत्री रवींद्र ओल्लारवार, जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे, महामंत्री गोविंद सारडा, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष योगिता भांडेकर, गडचिरोलीच्या माजी नगराध्यक्ष योगिता पिपरे, भाजपा शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, गडचिरोली तालुकाध्यक्ष रामरतन गोहणे, चामोर्शी तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, पं.स.चे माजी सभापती विलास दशमुखे, युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, ओबीसी आघाडीचे जिल्हा महामंत्री भास्कर बुरे, माजी नगरसेविका वैष्णवी नैताम, लता लाटकर, महिला आघाडीच्या शहराध्यक्ष कविता उरकुडे, हेमंत बोरकुटे, साईनाथ बुरांडे, भोजराज भगत, राजू खंगार, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष प्रतीक राठी, विलास नैताम, किशोर गटकोजवार, विजय गेडाम संजय चलाख, काशिनाथ बुरांडे, भुवनेश्वर चुधरी, रामचंद्र वरवाडे, गोंडवाना अगरबत्ती क्लस्टरच्या प्रमुख पदाधिकारी वैशाली हुस्के, निर्मला कोटावार तसेच उद्योजिका उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button