जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

नरभक्षी वाघाच्या हल्ल्यात जखमी महिला देत आहे मृत्यूशी झुंज!

Spread the love

गडचिरोली (दि,४ डिसेंम्बर)

गडचिरोली तालुक्यातील व चात गाव वनपरिक्षेत्रां अंतर्गत येत असलेल्या आंबेशिवणी आंबेटोली येथे वास्तव्य करणारी सोनम जितेंद्र उंदीरवाडे वय (२५ वर्ष) ही महिला घर परिसरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत शिवारात आपल्याला दोन वर्षाच्या लहान मुलीला घेऊन ती शेतात शेतकाम करीत असताना अचानक नरभक्षी वाघाने महिलेच्या पाठीवर हल्ला करून महिलेला गंभीर रित्या जखमी केले.

जखमी महिले शेजारी असलेल्या एका वीस वर्षाच्या तरुण मुलांनी नरभक्ष वाघाचा महिलेवर हल्ला होताच त्यांनी मोठ मोठ्यांनी ओरडून नरभकक्ष वाघाला पडून लावले.लगेच त्या मुलांनी आपल्या मोबाईलवर गाव कऱ्यांशी संपर्क साधून नरभक्षक वाघच्या तावडीतून महिलेला वाचविले.वाघाच्या हल्याची बातमी कळताच गावकऱ्यांनी महिलेच्या मदतीला धावून व लगेच जखमी महिलेला गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.जखमी महिलेची प्रकृती गम्भीर स्वरूपाची असून जखमी महिला मृत्यूशी झुंज देत आहे.जखमी महिलेला बघण्यासाठी गावाकऱ्यान सोबत वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुद्धा जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन मदतीचा हात दिला. गडचिरोली जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल रुडे यांनी सुद्धा जखमी महिलेची पाहणी करून महिलेवर योग्य उपचार करण्याचे सांगितले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button