जाहिरात
गडचिरोलीविशेष

स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय झाल्याबद्दल गडचिरोली प्रहार अपंग क्रांतीतर्फे जल्लोष

Spread the love

गडचिरोली (दि,३ डिसेंम्बर)

स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय झाल्याबद्दल जागतिक दिव्यांग दीनानिमित्त गडचिरोली प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागात लाडू मिठाई व वाजा गाजत जल्लोष केला. याबद्दल दिव्यांग बांधवांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी राज्यमंत्री बच्चू कडू, प्रहार दिव्यांग क्रांती महाराष्ट्र सचिव रामदास खोत यांचे आभार मानले. या सर्वांच्या पुढाकारातून जागतिक दिव्यांग दिनानिमित्त महाराष्ट्र सरकारमध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरु करण्यात आल्याबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

 

(स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मंजूर झाल्याबद्दल लाडू मिठाई व गाजा वाजात जल्लोष करताना दिव्यांग बांधव)

 

या कार्यक्रमाला प्रहार दिव्यांग जिल्हा अध्यक्ष अप्रव भैसारे, तसेच निखिल धार्मिक , प्रहार जनशक्ती पक्ष गडचिरोली तालुका अध्यक्ष हंसराज जनबंधू माजी ग्रामपंचायत सदस्य उत्तरा देव्हारे, प्रहार सैनिक राकेश कराडे, सामाजिक कार्यकर्ते कृष्णा सयाम, शालू जांभुळकर, मोहिन्द्र देव्हारे, संगीता लांजेवार, वसंता वलके, मधुकर जांभुळकर, कैलास कराडे, तुलाराम टेम्भूरणे, दयाराम भोंडे, मंजिल गहाणे, दयाराम भोंडे, चेतन लांजेवार शुभांगी जांभुळकर, ओझल विहीरघरे, रिया देव्हारे प्रहार कार्यकर्ते व आदी दिव्यांग बांधव उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button