जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युज

अहो साहेब,नवीन रस्त्यावर डांबर केव्हा टाकणार,६ महिने लोटूनही डांबराचा पत्ता नाही

Spread the love

लोकशाही न्युज,
गडचिरोली (दि,३ डिसेंम्बर)

गडचिरोली शहरातील चामोर्शी पोटेगाव डीपी बायपास रोड प्रभाग क्रमांक ५ येथील  चंदा मेश्राम ते  नारायण पचारे ते पिपरे यांच्या घरासमोरील रोड मागील एप्रिल महिन्यात डांबर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले रस्त्यावर निवड गिट्टी टाकून रोलर फिरविण्यात आली तेव्हापासून त्या रस्त्यावर आज तागायत डांबर टाकून रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही. आता त्या रस्त्यावरील गिट्टी उखडून राहिली आहे.

सदर काम पूर्ण व्हावे यासाठी वार्डातील जनतेने अनेकदा नगर परिषद प्रशासनाला निवेदने दिली पण अजूनही त्या निवेदनाकडे प्रशासनाने ढुंकूनही पाहिले नाही,किंवा कामावर देखरेख करणाऱ्या अभियंत्याने त्या रस्त्यावर अजून पर्यंत पाय सुद्धा ठेवले नाही.
सदरचे काम अजून किती दिवस लांबणीवर राहील व केव्हा पूर्ण होईल याचा थांग पत्ता नाही अशा काम चुकार कंत्राटदारावर व कामावर देखरेख ठेवणाऱ्या अभियंत्यावर प्रशासनाने ताबडतोब दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांनी  लोकशाही न्यूज प्रतिनिधी जवळ व्यक्त केली आहे.

१०० मीटर चा डांबर रस्ता बनवायला जर ६ महिने लागत असतील तर याला म्हणायचे काय ? सदरचे काम पूर्ण न करताच बिल लाटले की काय असा संशय वार्डवासीय व्यक्त करत आहेत.

 

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button