जाहिरात
क्राईम

जादुटोण्याच्या संशयावरुन महिलेसह दोघांना जिवंत जाळणाऱ्या १५ आरोपीना अटक

आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love

लोकशाही न्युज, एटापल्ली (दि,३ मे)

१ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र दिन साजरा करीत असताना त्याच दिवशी एटापल्ली तालुक्यातील बरसेवाडा गावामध्ये जादुटोन्याच्या संशयावरुन महिलेसह दोन व्यक्तींची गावाकऱ्यानी जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने संपूर्ण गडचिरोली जिल्हा हादरून गेला आहे १५ आरोपींना अटक करून ५ दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

सविस्तर वृत्त,
दि,२ मे रोजी पोस्टे एटापल्ली येथे दिलेल्या तक्रारी नुसार दि,१ मे रोजी एटापल्ली तालुक्यातील मौजा बरसेवाडा येथील नाव १) जमनी देवाजी तेलामी वय ५२ वर्षे व २) देवु कटिया अतलामी वय ५७ वर्षे या दोघांना गावातील काही इसम एकत्र येवुन गावात पंचायत बोलावुन हे दोघे जादुटोणा करतात कु. आरोही बंडु तेलामी वय साळे तीन वर्ष रा. बरसेवाडा हिचा मृत्यु जादुटोना केल्यामुळे झाला असा आरोप या दोघावरती करुन यांना अंत्यत निघृनपणे मारहाण करुन अंगावरती पेट्रोल टाकुन जिवंत जाळले. मृतक जमनी देवाजी तेलामी हिचा भाऊ सादु मासा मुहोंदा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन एटापल्ली पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

या घटनेची समाजातील सर्व स्तरातुन खेद व्यक्त करुन मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी याकरीता मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य व तीव्रता लक्षात घेवुन पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी चैतन्य कदम उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली व निलकंठ कुकडे प्रभारी अधिकारी पोस्टे एटापल्ली यांना तपास पथकासह सदरच्या प्रकरणाचा छडा लावुन आरोपींना जेरबंद करण्याबाबत निर्देशीत केल्याने वरील अधिकारी व सहकारी अधिकारी यांनी अंमलदारासह बारसेवाडा येथे जावुन घडलेल्या घटनेची घटनास्थळ पाहणी करुन सखोल चौकशी अंती १५ आरोपींना अटक करण्यात आली.

अटक केलेल्या आरोपी खालील प्रमाणे १) अजय बापु तेलामी, २) भाऊजी शत्रु तेलामी, ३) अमित समा मडावी, ४) मिरवा तेलामी, ५) बापु कंदरु तेलामी, ६) सोमजी कंदरु तेलामी, ७) दिनेश कोलु तेलामी, ८) श्रीहरी बीरजा तेलामी, ९) मधुकर देवु पोई, १०) अमित ऊर्फ नागेश रामजी तेलामी, ११) गणेश बाजु हेडो, १२) मधुकर शत्रु तेलामी, १३) देवाजी मुहोंदा तेलामी, १४) दिवाकर देवाजी तेलामी, १५) बिरजा तेलामी सर्व रा. बारसेवाडा ता. एटापल्ली जि. गडचिरोली यांना पोस्टे एटापल्ली अप. क्र. २४/२०२४ मधील कलम ३०२, ३०७, २०१, १४३, १४६, १४९, भादवी, सहकलम ३ (२) महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अन्वये दाखल गुन्हयात अटक करण्यात आला आहे. सर्व आरोपींना मा. प्रथम वर्ग न्यायालय, अहेरी येथे हजर केले असता सर्व आरोपींना ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजुर करण्यात आली.

सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नीलोत्पल ,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) यतिश देशमुख,अपर पोलीस अधीक्षक, अहेरी एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी एटापल्ली चैतन्य कदम यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक निलकंठ कुकडे प्रभारी अधिकारी पोस्टे एटापल्ली, सहायक पोलीस निरीक्षक शिंदे,  नागरगोजे, म्हेत्रे,  गिरवलकर, व इतर सर्व अंमलदार यांनी मेहनत घेवुन गुन्हा उघडकीस आणला.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button