लोकशाही पोर्टल न्यूज
सुदर्शन गोवर्धन
व्याहाड बुज सर्कल प्रतिनिधी(दि,२३ ऑक्टोंबर)
सावली तालुक्यातील खेडी येथील दीपक बाळू पेंदाम वय-32 वर्षीय युवक पोंभुर्णा येथे मागील दोन वर्षापासुन विद्युत सहायक (लाईन मॅन) पदावर काम करीत होते.
पोंभुर्णा येथिल मुख्य चौकात खांबावर चढून काम करीत असता विद्युत शाॅक लागून दीपक पेंदाम यांचा दुदैवी मृत्यू झाला.
ऐॆन दिवाळीच्या सणात लोकांना उजेडात राहता यावे. याकरीता कर्तव्यावर असतानाच अचानक जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
त्याच्या पशच्यात पत्नी, दोन लहान मुली, आई असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
जाहिरात
