डोनाळा, सोनापूर येथिल पोलिसपाटील पद भरा.
लोकशाही न्यूज
सुदर्शन गोवर्धन
व्याहाड सर्कल प्रतिनिधी (दि,२२ ऑक्टोंबर)
सावली तालुक्यातील डोनाळा व सोनापूर या ग्रामीण भागात पोलिस पाटील पद रिक्त असून ते लवकरात लवकर भरावे.
पोलिस विभाग संबंधित हे पद असून गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिस पाटील यांच्यावर असते.शिवाय शाळकरी विद्यार्थी आणि ग्रामस्थांना अनेक प्रकारच्या कामा करिता पोलिसपाटील ह्यांच्या दाखल्याची आवश्यक भासते. परंतु सोनापूर येथिल पोलिसपाटील पद गेली चार वर्ष रिक्तच आहे.
आता तर पूरबुडी व शेती विषयक निधी नंबरदार असलेल्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सरळ निधीजमा केल्यामुळे त्यांना संमती प्रमाणपत्र, वारसान प्रमाणपत्र, या दाखल्याची आवश्यक असल्याने डोनाळा गावातील प्रभार कढोली येथिल पोलिसपाटील यांच्याकडे दिले असल्याने जेस्ट नागरिक , वयोवृद,अपंग, यांना दाखल्यासाठी कढोली येथे जाने शक्य नसून डोनाळा येंथील नागरिकांना त्रास होत आहे.
दोन्ही गावातील पोलिसपाटील पद प्रशासनाने तातडीने भरावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
