जाहिरात
चिमुर

ब्रेकिंग-आज मौजा वहाणगाव येथे सरकारी स्वस्त धान्य दुकानाच्या विषयावर गावकऱ्यांनी केला हायवेवरच चक्का जाम.

एक तासान॓तर शेगाव पोलीस स्टेशन चे ठाणेदार यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात यश.

Spread the love

प्रतीनीधी- प्रवीण वाघे,(दि,२१ ऑक्टोंबर)

वहाणगांव येथील सरकारी स्वस्त धान्य दुकान श्रीमती मंगलाबाई गौरकार याच्या नावाने होते. कोरोना काळात त्यांनी धान्याची मोठी अफरा तफर करण्यात आली होती. त्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली त्याच्यावर गुन्हे नोंद केले व त्यांचा परवाना रद्द करून स्वस्त धान्य दुकानाचा तात्पुरता वाटप आदिवासी सहकारी संस्था मर्यादित वहाणगांव ला देण्यात आला होता.


मात्र आता त्या दुकान मालकाच बनावटी वारस सुरज रामटेके यांना कोणतीही चौकशी न करता तसेच गावकऱ्यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता परवाना देण्यात स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देण्यात आला .
सर्व गावकरी लोकांना हे मान्य नाही. आमचा वाटप आदिवासी सहकारी संस्थेतून व्हावा या निर्णयावर ठाम आहे. सर्व ग्रामस्थांनी सहिनीशी निवेदन तहसीलदार साहेब चिमुर , DSO साहेब चंद्रपूर, मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य व जिल्हाधिकारी साहेब यांना दिले मात्र दुकानाचा परवाना सुरज रामटेके याना दिल्याने ग्रामस्थांनी संतप्त होऊन रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन केले.
घटनेची माहीती मिळताच शेगांव पोलीस स्टेशन चे ठानेदार मेश्राम हे आपल्या टीमसह घटनास्थळी पोहचले व ठाणेर या॓नी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी दुरध्वनी वरून या प्रकरणाची योग्य चौकशी करून योग्य निर्णय देऊ व तोपर्यंत वाटप आदिवासी सहकारी संस्था करेल असे आश्वासन त्यांनी दिले. व नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button