ब्रेकिंग न्युजसावली
मोठी बातमी,,ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील २ जागीच ठार
सावली (दि,१८ ऑक्टोंबर)
चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावरील सावली येथील महात्मा फुले चौका समोर चंद्रपूर वरून गडचिरोली कडे जाणाऱ्या ट्रक (MH 49 1127) ने आपल्या नातेवाईक ला भेटून गावाकडे जाणाऱ्या शिर्शी येथील उपसरपंच दादाजी किन्हेकार यांचा मुलगा व आई हे जात असतानाच भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रक ने त्याला जोरदार धडक दिली व त्यांना चिरडून ट्रक पुढे नेण्यात आले.या घटनेतील मृतकांची नावे बबलु उर्फ देवानंद दादाजी किन्हेकार वय 28 वर्षे व लक्ष्मीबाई आनंदराव किन्हेकार वय 75 वर्षे हे जागीच ठार झाले.
ट्रक चालक पोलीस स्टेशन च्या परिसरात ट्रक सोडून फरार झाला.पुढील तपास सावलीचे ठाणेदार आषिश बोरकर करीत आहेत.
जाहिरात
