वृद्धाश्रमात साडी वाटप करून BRSP टीमने साजरा केला राज बनसोड यांचा वाढदिवस
गडचिरोली (दि,१९ ऑक्टोंबर)
आजकाल वाढदिवस मनला की सारे जन मोठया उत्साहात तो साजरा करण्यासाठी धडपड करत असतात. BRSP चे जिल्हा प्रभारी राज बन्सोड यांनी आपला वाढदिवस गडचिरोली येथील वेदांती वृद्धाश्रमात वृद्धासोबत साजरा केला, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वेदांती वृद्धाश्रमाचे संचालक मिलिंद डोंगरे हे उपस्थित होते, विशेष अतिथी म्हणुन डॉ. आशिष खोब्रागडे, BRSP जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, SN24 चे संपादक दिपक बोलीवार उपस्थित होते.
यावेळी BRSP प्रभारी राज बन्सोड म्हणाले की वाढदिवस असला की पार्टी, खाणे, पिणे हा सारा प्रकार असतो व त्यावर कित्तेक लोक कितीतरी पैसा खर्च करत असतात..! पण त्याचा कोणताही समाजाला उपयोग किंवा फायदा होत नाही. जर नुसता एन्जॉय म्हणुन आपण अशाप्रकारे पैसा खर्च करत असू तर प्रत्येक व्यक्तीने त्या पैशाच्या किमान अर्धा पैसा तरी समाजातील गरजूवर किंवा समाजपयोगी बाबीवर खर्च केल तर खऱ्या अर्थाने समाजात चांगली संस्कृती किंवा परंपरा रुजू होईल असे वक्तव्य राज बन्सोड यांनी गडचिरोली येथील वृद्धाश्रमात वाढदिवस साजरा करताना केले. व माझ्या प्रत्येक वाढदिवसाला स्वतःवर जेवढे पैसे एन्जॉय साठी खर्च होतील त्याच्या किमान अर्धे तरी समाजपयोगी कार्यात खर्च करण्याचे आश्वासन दिले.
याचाच भाग म्हणुन राज बन्सोड यांनी वेदांती वृद्धाश्रमात असणाऱ्या महिलांना साळ्या वितरित व फळ वाटप करुन कार्यकर्त्यांसह वाढदिवस साजरा केला..!
यावेळी वेदांती वृद्धाश्रमाचे कर्मचारी, BRSP पदाधिकारी मिलिंद बांबोळे, प्रतीक डांगे, जितेंद्र बांबोळे, प्रितेश अंबादे, सतीश दुर्गमवार, उज्वल मोहुर्ले,शिवसेना नेते विवेक बारसिंगे उपस्थित होते.
