जाहिरात
विशेष

हुबळी-धारवड (कर्नाटक) येथील राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होणार जिल्ह्यातील युवक,अनुप, राधिका, वृषभ, पंकज, सिद्धी यांची निवड

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (१२ जानेवारी):

भारत सरकार च्या युवा आणि खेळ मंत्रालय च्या वतीने नेहरू युवा केंद्र द्वारा आयोजित २६ वे राष्ट्रीय युवा महोत्सव १२ ते १६ जानेवारी दरम्यान ऐतिहासिक नगरीं हुबळी- धारवड (कर्नाटक) येथे होणार असून या महोत्सवकरिता गडचिरोली जिल्ह्यातून नेहरू युवा केंद्र च्या वतीने जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनुप कोहळे,राधिका जुवारे, वृषभ मेश्राम, पंकज लाडे, सिद्धी उपाध्याय या युवकांची निवड करण्यात आली आहे, हे युवक राष्ट्रीय युवा महोत्सवात गडचिरोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहे. “विकसित युवा – विकसित भारत” या थीम वर यावर्षीचे महोत्सव होणार असून यामध्ये महाराष्ट्रातील इतर जिल्ह्याबरोबर देशभरातील ७५०० हुन अधिक युवक आणि युवतीचा सहभाग असणार आहे.


या महोत्सवाचे उदघाट्न स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी १२ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत, मुख्यमंत्री बसवराज बोमई, केंद्रीय खेळ मंत्री अनुराग ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडणार आहे. या महोत्सवात देशभरातील विविध संस्कृती, क्रीडा, पोशाख, खानपान यांचे प्रत्यक्ष दर्शन युवकांना घडवून आणण्यात येणार आहे. सोबतच विविध विषयावर मार्गदर्शन शिबीर सुद्धा यावेळी पार पडणार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button