जाहिरात
आरोग्य

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सामान्य रुग्णालयाला सदिच्छा भेट

रुग्णांशी साधला थेट संवाद

Spread the love

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.१४ फेब्रुवारी)

राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज स्थानिक सामान्य रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी करत रुग्णसेवेचा दर्जा सुधारण्याबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या. याप्रसंगी स्थानिक आमदार डॉ. मिलिंद नरोटे, पुणे आरोग्य विभागाचे संचालक डॉ. विजय कंदेवाड, डॉ. रामजी आडकीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे यांच्यासह रुग्णालयाचे अधीक्षक व आरोग्य विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रुग्णांशी थेट संवाद
!!!
नामदारांनी अंतर्विभागातील (IPD) रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. रुग्णालयाकडून मिळणारे उपचार, औषधसाठा आणि जेवणाचा दर्जा याबद्दल त्यांनी रुग्णांशी थेट संवाद साधून समाधान व्यक्त केले.

अतिदक्षता विभाग (ICU) व बाह्यरुग्ण विभाग (OPD)
!!!
अतिदक्षता विभागातील अद्ययावत उपकरणांची त्यांनी पाहणी केली. तसेच, बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांना ताटकळत राहावे लागू नये, यासाठी नोंदणी प्रक्रिया अधिक जलद करण्याचे निर्देश दिले.

रक्तपेढीची पाहणी
!!!
रुग्णालयातील रक्तपेढीला भेट देऊन त्यांनी रक्ताच्या उपलब्धतेबाबत माहिती घेतली. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना दिल्या.

NCD विभाग विस्तृत आढावा
!!!
असंसर्गजन्य रोग (NCD) विभागाला भेट देऊन त्यांनी वाढत्या जीवनशैली आजारांवर (उदा. मधुमेह, उच्च रक्तदाब) केल्या जाणाऱ्या उपचारांची माहिती घेतली. या विभागाचे सक्षमीकरण करून जास्तीत जास्त नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट त्यांनी मांडले.

प्रकाशजी आबिटकर,
आरोग्य मंत्री
!!
सामान्य माणसाला दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि कर्मचाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करावे, शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे

या भेटीमुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले. आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी स्थानिक आरोग्य समस्यांकडे नामदारांचे लक्ष वेधले, ज्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button