सुदर्शन गोवर्धन
लोकशाही न्यूज पोर्टल
व्याहाड सर्कल प्रतिनिधी(दि ११ ऑक्टोंबर)
सावली तालुक्यातील सोनापुर येथे राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेअंतर्गत सोनापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सुभाष चंद्र बोस हायस्कूल व अंगणवाडीमध्ये दि.१०/१०/२०२२ कला मुलामुलींना जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
जे लाभार्थी या दिवशी नव्हते किंवा इतर कारणांमुळे गोळी घेणे शक्य झाले नाही. त्यांना १७ ऑक्टो.२०२२ रोजी शाळा वअंगणवाडीमध्ये मॅप अप दिनी गोळी देण्यात येणार असल्याचे श्री.भोंडे आरोग्य सेवक यांनी सांगितले.

राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेचा उद्देश १ते १९वयोगटातील सर्व मुला-मुलींना अंगणवाडी व शाळेच्या ठिकाणी जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे.तसेच पोषणस्थिती , शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावणे हा आहे. व आतड्यातील कृमीदोषामुळे बालक व किशोरवयीन मुले- मुली रक्तक्षय व कुपोषनास बळी पडू नये याकरिता जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात येते.

याप्रसंगीश्री. भोंडे आरोग्य सेवक,कु. स्नेहा गोवर्धन आरोग्य सेविका,,कू. वैजयंतीमाला शंभरकरआरोग्य सेविका, श्री. बोधे सर मुख्यध्यापक जि. प. प्रा शाळा, श्री. सुभाष गीरडकर मुख्यध्यापक सू. चंद्र. बोस हायस्कूल तथा शिक्षकोत्तर कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी उपस्थित होते.
