जाहिरात
चिमुरनेरी

विषारी सापाच्या दंशाने महिलेचा मृत्यू, नेरी जवळील मोखाळा येथील घटना.

Spread the love

प्रतिनिधी- प्रवीण वाघे (दि,११ ऑक्टोंबर)

नेरी वरुन जवळ असलेल्या मोखाळा येथील महिलेला विषारी सापाने दंश केल्याने तिला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु प्रकृती खूपच हालवत चालल्याने तिला नागपूर येथे रेफर करण्यात आले परंतु वाटेतच नागपूर जवळ तिचा मृत्यू झाला.
सविस्तर माहिती असे की मृतक जया चिंतामण तामगाडगे राहणार मोखाळा ह्या दि 10 ऑक्टोबर ला रात्री कुटूंबियांसोबत जेवण आटपून झोपी गेले असता मध्यरात्री ऐका विषारी सापाने घरात प्रवेश करून गाढ झोपेत असलेल्या जया तामगाडगे या महिलेला दंश केला यानंतर लगेच महिलेला जाग आली आणि दंश केलेल्या ठिकाणी पाहताच सापाने दंश केल्याचे दिसून आले त्यामुळे तिला तात्काळ उपचारासाठी उपजिल्हारुग्णालय चिमूर येथे हलविण्यात आले उपचार सुरू असताना प्रकृती खालावत असल्याने तिला पुढील उपचारासाठी दि 11 ऑक्टोबर सकाळी नागपूर मेडिकल ला नेत असताना नागपूर जवळ वाटेतच तिचा मृत्यु झाला तिच्या अचानक जाण्यामुळे कुटुंबियावर आघात झालाअसून शोककळा पसरली आहे संपूर्ण मोखाळा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button