शेकडो कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश! मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुपट्टा टाकून केले स्वागत
सिरोंचा तालुक्यातील आसरअली, अंकीसा भागातील कार्यकर्त्यांचा समावेश

लोकशाही न्युज,अहेरी (दि,६ ऑक्टोबर)
ऐन निवडणुका तोंडावर असताना सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकीसा येथील काँग्रेस पक्षाचे व इतर पक्षातील कार्यकर्ते रविवार ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश केले.मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी पक्षाचा दुप्पटा टाकून स्वागत केले.
राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष रियाज शेख यांच्या नेतृत्वात सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली, अंकीसा जिल्हा परिषद क्षेत्र सर्कलतील काँगेस पक्षाचे पापा सेट यांच्या मार्गदर्शनात येथील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केले.पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये गोमासे लसमया, गोमासे मोंडी, गोदारी मंतया,बेडके जंपया, गोदारी लस्मया, जोडे सिकंदर, रेकाम सागर, गोवासी बुचाम, दुर्गम श्रीवास आदींचा समावेश आहे.
आणि नडीगुडा, कोत्तापल्ली, चीतरवेला, माडेम समया, माडेम सागर, गुमपुला राम, कलवा श्याम, पुतला कल्याण, माडेम अंजी, पूतला अजय, महिंद्र जाडी, सापडी विनोद, माडेम कमलाकर, कुम्मरी नवीन, दुर्गम सेखर, सदनपू रामय्या, साजिद शेख, गुंपुला सारय्या, गज्जेला सडवली, अजिज्ञ शेख, बेडके बापू, गोमासे सारय्या, दुर्गम सारय्या, बेडके सारवेल्ली आदी व असंख्य कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)पक्षात प्रवेश केले.
आता लवकरच विधानसभा निवडणुकीचे आचार संहिता लागणार असून ऐन विधानसभा निवडणुका तोंडावर असताना सिरोंचा तालुक्यातील आसरअली, अंकीसा व परिसरातील अन्य पक्षातील कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (अजित पवार गट) प्रवेश केल्याने पक्षाला अजून एक नवे बळ, उभारी व ताकद मिळाली आहे.
