जाहिरात
व्हाहाड

सोनापूर येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

Spread the love

व्हाहाड (दि,६ ऑक्टोम्बर)

66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज दि.05/10/2022 रोज बुधवारला सकाळीं 7: 00 वा. सम्राट अशोक बुद्धविहार येथे बौध्द समाज नगर शाखा कमेटिचे सर्व पदाधिकारी व रमाई महीला मंडळ आणि सर्व बौध्द बांधवानी त्रिशरण पंचशिल ग्रहण करून सम्राट अशोक, भगवान गौतम बुद्ध, राजे छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुलें , आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोना अभिवादन केले. याप्रसंगी बौध्द समाज नगर शाखा कमेटीचे अध्यक्ष श्री. पुरुषोत्तमजी बांबोळे यांच्या हस्ते पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.


सायंकाळी 5:00 वा सम्राट अशोक विहारापासून रॅली काढण्यात आली होती.त्यानंतर धोल्याचे चौकात आगमन झाले, त्यानंतर ग्रामपंचायत भवणाकडे रॅली वळली, त्यानंतर हनुमान मंदिराकडे फिरविण्यात आली. त्यानंतर परत सम्राट अशोक बुद्ध विहाराकडे रॅली वळविण्यात आली आणि समारोप केला. रॅलीत संपुर्ण बौध्द बांधव तसेच श्री.यशवंतजी गुरनुले माजी उपसरपंच ग्रां. पं सोनापूर, व श्री.हंसराज गुरनुले सा.कार्यकर्ता सोनापूर प्रामुख्याने रॅलीत सहभागी झाले होते. रॅलीत जय घोषाचा निनाद ही उत्साह निर्माण करणारे होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button