जाहिरात
नक्षली घडामोडीब्रेकिंग न्युज

चकमकीत १ जहाल महिला नक्षली ठार, नक्षली साहित्य जप्त

पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची पत्रकार परिषदेत माहिती

Spread the love

गडचिरोली /अहेरी ( दि,३० सप्टेंबर)

उपविभाग अहेरी अंतर्गत येणा­ऱ्या उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीत मौजा कापेवंचा जंगल परिसरात विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर अहेरी दलम, पेरमिली दलमचे ३० ते ४० नक्षलवादी मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने दि.२८ सप्टेंबर रोजी सकाळी एकत्र जमलेले असल्याच्या गोपनिय माहीतीवरुन मौजा कापेवंचा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-६०) जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दि,२८ सप्टेंबर रोजी सायं.७ ते ८ वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ३० ते ४० नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला, जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वंरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळावर १ नक्षल मृतदेह सापडले. तसेच मृतदेहासोबत ८ एमएम रायफल व मोठया प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. नक्षल मृतदेह जिल्हा मुख्यालय येथे आणले असता, सदर मृतदेह हे काळे-हिरवे कपडे घातलेल्या महिला नक्षलीचा असून, तिची ओळख पटविणे सुरू आहे.

 

पत्रकार परिषदेला पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल,अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख ,अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे हजर होते,

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button