मूलचेरा
महिला सरपंच ला १८ हजार घेणे पडले महाग, लाचलुचपत विभागाची कारवाई

गडचिरोली/मूलचेरा (दि,३० सप्टेंबर)
बांधकामाचे चेक देण्याकरिता ३१ हजार रुपयांची लाच रकमेची मागणी करून तडजोडीअंती १८ हजार रुपयांची लाच रक्कम स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मुलचेरा तालुक्यातील विवेकानंदपुर येथील ग्रामपंचायत सरपंचा श्रीमती. भावना शैलेन मिस्त्री (३०) यांना आज २९ सप्टेंबर रोजी रंगेहाथ पकडले आहे. सदर कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
जाहिरात