जाहिरात
चिमुर

कालपासुन चिमुर शहरात मुल पळवुन नेणारी टोळी आली आहे ही अफवाच. चिमुर पोलीस स्टेशन ठाणेदार मनोज गभणे यांची माहिती

Spread the love

प्रतीनीधी-प्रवीन वाघे,(दि,२९ सप्टेंबर)

काल पासून चिमूर व परिसरामध्ये मुले पळवून नेणारी टोळी आली आहे याबाबतच्या सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जात आहे व एका मुलीच्या आपबीती कथनचा व्हिडिओ वायरल केल्या जात आहे या घटने संबधाने बारकाईने चौकशी करण्यात आली परंतु तशी वस्तुस्थिती दिसून आली नाही. धार्मिक कार्यक्रमाची माहूर साठी निघणारी पालखी याकरिता काही महिला व मुले हे लोकांना पावती देऊन वर्गणी मागत असल्याचे दिसून आल्याने सदर महिलांना बोलावण्यात येऊन त्यांची शहानिशा केली असता त्यांची गुन्हेगारी किंवा संशयी पार्श्वभूमी दिसून आली नाही याचं महिला संबधात काही लोकांनी खोट्या अफवा पसरविल्या आहेत. तरी जनतेने अशा अफवांवर विश्वास ठेवू नये व भितीदायक व जनतेमध्ये दहशत पसरेल असे कोणतेही फोटो किंव्हा व्हिडिओ कोणत्याही सोशल मीडियावर व्हायरल करू नये असे कृत्य करणे कायद्याने गुन्हा आहे. अस चिमुर पोलीसा॓कडुन आव्हान केले.

(अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करताना चिमूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार  मनोज गभणे )

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button