जाहिरात
सावली

वाघाच्या हल्यात गाय व वासरू ठार

Spread the love

सावली (दि,१७ सप्टेंबर)
सावली तालु्क्यातील चक पेठगाव जंगल परिसरात गाय व वासरू ठार केल्याची घटना रविवारी समोर आली. सावली तालुक्यातील चक पेठगाव येथील शेतकरी यशवंत भिकाजी गाडेकर यांच्या मालकीची गाय व वासरू आणि गावातील शेतकऱ्याकडील गुरे चारण्यासाठी गुराखी मुकरू गेडेकर व नारायण मांडवकर यांनी दिनांक 17/09/2022 शनिवारला नेहमीप्रमाणे जंगल परिसरात चराईकरिता नेली. चराई करून सायंकाळच्या 5:00 सुमारास गावाकडे परत येत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने संधी साधून गायीची शिकार केली.
घरी गुरांचा कळप घेऊन आल्यानंतरच सायंकाळी गाय व वासरू घरी न आल्याने यशवंत भिकाजी गाडेकर यांनी परिसरात शोध घेतला. पण गाय व वासरू सापडली नाही.
रविवार दिनांक 18/09/2022 (वाघाच्या हल्ल्यात ठार झालेला वासरू)

सकाळीं पुन्हा गावातील काही सोबती घेऊन जंगल परिसरात शोध घेतला असता गाय व वासरू मृतावस्थेत आढळून आली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. गाय व वासरू ठार झाल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून भरपाई देण्यात यावी व वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी गावकऱ्यानी व परिसरातील शेतकरी वर्गाने केली आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button