ग्रामसेवक के. वाय.बनपुरकर यांचे स्थानांतरण झाल्याने मुरमाडी वासीयांनी दिला सदिच्छा निरोप समारंभ
गडचिरोली (दि,१८ सप्टेंबर)
सदर कार्यक्रम मौजा मुरमाडी गावकऱ्यांच्या वतीने घेण्यात आला.यावेळी राजे छत्रपती स्मारक संघटना मुरमाडी यांच्या हस्ते बनपूरकर यांना शाल श्रीफळ व राधा कृष्ण ची मूर्ती भेट देऊन सत्कार करण्यात आला.

आज दिनांक १८/०९/२०२२ ला दुपारी १२:०० वा. गावकऱ्यांच्या वतीने के. वाय.बनपुरकर यांचा सत्कार सदिच्छा निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री काशिनाथ पाटील डोईजड तर सत्कार मूर्ती के. वाय बनपुरकर ग्रामसेवक व श्रीकृष्ण मंगर ग्रामसेवक,जीवनदास ठाकरे ग्रामसेवक. आणि सौ सुनीता कवीश्वर बनपुरकर. व प्रमुख पाहुणे प्रल्हाद म्हशाखेत्री ,नानाजी काळबांधे ,हेमके इलेक्ट्रॉनिक
गेडाम ग्रामसेवक. प्रमुख अतिथी सरपंच भोगेश्र्वर कोडाप, उप सरपंच यशवंत डोईजड, तंठामुक्त अध्यक्ष मोरेश्वर आवारी.पोलिस पाटील गिरधर बोरकर ,व्ही देशमुख.देविदास बांबोळे.मनोहर भोयर.चंद्रभान नैताम. सौ हिरकण्या बोरकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भाषण काशिनाथ डोईजड यांनी केले ते बोलताना व्यक्त केले की कार्यक्रम आणि निरोप समारंभ प्रत्येकाचाच येवढ्या उत्साहाने साजरे होत नाही तर त्यासाठी कर्तव्यदक्ष सेवा करून विकास करावा लागतो आणि ते बनपुरकर साहेबांनी यांनी आपल्या कार्यकाळात गावात सर्वप्रथम कौटोंबिक नाते तयार करून गावतील २ पार्टी एक जोडून तरुण मुलांची संघटना तयार केली.आणि त्या संघटनेच्या मार्फत गावामध्ये शिवाजी महाराज स्मारक उभ केल ते आपल्या आजू बाजूला च नाही तर जिल्ह्यात तेवढं कार्यक्रम झाला नाही तो कार्यक्रम घेण्यात आला अशाप्रकारचे कार्य बनपुरकर ग्रामसेवक यांनी केला.तसेच कुठे लहान सहान समस्या रहली तर निधीची वाट न पाहता ती समस्या सोडवण्यात मोठं योगदान आहे त्यामुळे हा निरोप समारंभ कार्यक्रम मोठ्या संख्येने घेण्यात आला.असे मनोगत काशिनाथ डोईजड यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिन भुसारी यांनी केले तर प्रास्ताविक व्ही देशमुख यांनी मांडले.तर
