जाहिरात
सावली

मोठी बातमी,,पेडगाव ( कापसी) येथे वाघाच्या हल्यात बैल गंभीर जखमी ….

Spread the love

सावली तालुक्यातील पेडगाव परिसरात वाघाच्या हल्यात बैल गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक 15/09/2022ला सायंकाळी 5: 00वा. घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वाघाच्या हल्यात पेडगाव येथील श्री. काशिनाथ माधव चुधरी यांच्या बैलाला वाघाने गंभीर जखमी केले आहे. गावातील गुराखी श्री देवाजी मेश्राम व आबाजी पेंदोर नेहमीप्रमाणे गावातील गुरे चारण्यासाठी जिल्हा परिषद शाळेमागील अंदाजे अवघ्या 1000 फुटावरील अंतरावर डोंगरीवरती नेली. परतीच्या वेळेस दबा धरुन बसलेल्या वाघाने बैलावर झडप घातली.

इत्तर जनावरे सैरावरा पळूलागले. पण तोपर्यंत वाघाने बैलाची खोंड आपल्या जबड्याने पूर्णतः फोडून काढली.गुराख्याच्या वेळीच आरडा ओरड केल्याने वाघाने जंगलाकडे पळ काढला. बैल गंभीर जखमी झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले.वनविभागाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी. तसेच वनविभागाने परिसरातील वाघांचा बंदोबस्त लवकरात लवकर करावे अशी मागणी पेडगाव, भानशी, कापसी, सोनापुर, सामदा या परिसरातील नागरिक करीत आहेत. गेल्या दोन दिवसाच्या कालावधीत वाघाने सोनापुर येथील शेतकऱ्यांवर वाघाने जखमी केले होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button