बिआरएसपीच्या नाराज पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राजीनामे

लोकशाही न्युज, गडचिरोली (दि,२४ जून)
लोकसभेत उमेदवार निवडीवरून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षामध्ये जिल्ह्यात फूट पडलेली दिसली. बिआरएसपी उमेदवार बारीकराव मडावी योग्य नसल्याचा कारण देत जिल्ह्यातील बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते चळवळीतील कार्यकर्ता म्हणून अपक्ष उमेदवार विनोद मडावी यांच्या बाजूने प्रचारात उभे राहिले. दरम्यान पक्ष विरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत केवळ पक्षाचे प्रभारी राज बन्सोड यांना ६ वर्ष पक्षातून निलंबित करण्यात आले होते. निवडणुकीत बिआरएसपी उमेदवार बारीकराव मडावी यांना २५५५ मते तर बंडखोर उमेदवार विनोद मडावी यांना ६१२७ मते पडली असून निवडणुकीनंतर वरिष्ठ नेत्यांकडून सदर कारवाई रद्द होईल या अपेक्षेत सर्व पदाधिकारी होते परंतु तसें कोणतेही संकेत न दिसल्याने राज बन्सोड यांच्या समर्थनात बिआरएसपीच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी पत्रकाद्वारे सामूहिक राजीनामे देऊन लवकरच पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे सर्वांनी सांगितले.
जिल्ह्याचे BRSP जिल्हा महासचिव पुरुषोत्तम रामटेके, जिल्हा सचिव जितेंद्र बांबोळे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन वैद्य, आरमोरी विधानसभा अध्यक्ष सचिन गेडाम, युवा आघाडी जिल्हाध्यक्ष प्रितेश अंबादे, गडचिरोली तालुकाध्यक्ष तामस शेडमाके, तालुका सचिव प्रणय दरडे, तालुका उपाध्यक्ष गोकुळ ढवळे, गडचिरोली शहराध्यक्ष प्रतीक डांगे, शहरसचिव नागसेन खोब्रागडे, मीडिया प्रभारी सतीश दुर्गमवार, युवा आघाडी उपाध्यक्ष प्रफुल रायपुरे, जिल्हासचिव संघरक्षित बांबोळे, आरमोरी अध्यक्ष पियुष वाकडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष तारका भडके, जिल्हा सचिव शोभा खोब्रागडे, जिल्हा उपाध्यक्ष विभा उमरे, करुणा खोब्रागडे, तालुकाध्यक्ष सविता बांबोळे, तालुका उपाध्यक्ष पौर्णिमा मेश्राम, शहर सचिव प्रतिमा करमे, शहर कोषाध्यक्ष सोनाशी लभाने तथा विद्यार्थी मोर्चाचे कमलेश रामटेके इत्यादी पदाधिकार्यानी पत्रकावर सह्या करून राजीनामा प्रसिद्ध केला. पदाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे बिआरएसपी ला जिल्ह्यात मोठा हादरा बसला असून, पक्षाध्यक्ष डॉ.सुरेश माने यांच्याबद्दल कोणतीही नाराजगी नाही परंतु जिल्ह्या प्रभारी राज बन्सोड यांच्यानेतृत्वात काम करून आम्ही पक्ष वाढविला आणि पक्षाकडे वारंवार त्यांचे निलंबन परत घेण्यासंदर्भात विनंती करूनही कोणताही निर्णय वरिष्ठाकडून न आल्याने आम्ही राजीनामे देत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी पत्रकात म्हटले आहे.
