वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नावे सांगून अहेरी परिसरातील तलाठ्यानी केली पैसे वसुली!
अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष निर्मूलन समितीची तक्रार

लोकशाही न्युज,गडचिरोली(दि. १८ मे )
अहेरी तालुक्यातील तहसील कार्यालय अंतर्गत येत असलेल्या व अहेरी तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले तलाठी व्यंकटेश जेल्लेवार महागावं (खुर्द ), सचिन मडावी चिंचूगुंडी, व रवी मेश्राम कोडसेपल्ली परिसरातील व शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या तीन तलाठ्यांनी संगनमत करून राजधानी अहेरी येथे वास्तव्य करीत असलेले ठेकेदार फैजान युसूफ खान यांची दि, ८ मे २०२४ व दि,११ मे २०२४ ला त्याची प्रत्यक्ष भेट घेवुन पटवारी व्यंकटेश जेल्लेवार महागावं (खुर्द ) यांनी तुम्हास रॉयल्टी काढण्याची काही आवश्यकता नाही तूम्ही एक काम करा अगोदर मला १० हजार रुपये दया? व तुमचे ठेकेदारी काम सतत सुरू ठेवण्याचा सल्ला दिलेला आहे.

तसेच सचिन मडावी चिंचूगुंडी, व रवी मेश्राम कोडसेपल्ली या दोन्ही तलाठ्यानी ठेकेदार यांच्याकडे जावून व तहसिलदार यांनी पाठवुन तुमच्या सुरू असलेल्या गाड्या जप्त करण्याचा आदेश देवून एक लाख रुपये द्या ! अशी रक्कमेची मागणी सुधा केलेली आहे.
सबंधित तहसीलदारानी सदर घटीत घटनेची योग्य चौकशी करून शासकिय सेवेत कार्यरत असलेल्या सबंधित तिन्ही भ्रष्ट तलाठ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची व त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी गडचिरोली जिल्हा भ्रष्टाचार समितीचे जिल्हाध्यक्ष शंकर धोलने यांनी आदित्य जीवने सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अहेरी यांना दिलेल्या निवेदनातून केलेली आहे.
