जाहिरात
निधन वार्तासावली

सोनापूर येथील युवकाचे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान निधन

Spread the love

लोकशाही न्युज,सावली (दि,२० जून)

सावली तालुक्यांतील सोनापूर गावातील व्याहाड खुर्द येथील वर्ग ११ वी मध्ये जे.के.पाल कनिष्ठ कला, विज्ञान महा विद्यालयात शिक्षण घेत असलेला विदयार्थी यश शरद बांबोळे वय १७ वर्ष हा उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालविण्यासाठी मामाच्या गावाला रा. वासाळा ता. जि. गडचिरोली येथे गेला. गुरुवार दि. १७ जून २०२३ ला तिथे त्याला पोटात बर वाटत नव्हत त्यासाठी त्याच्या आजोबांनी त्याला गावातील डॉक्टर कडे नेले असता त्याला गडचिरोली येथे जाण्यास सांगितले . गुरुवारला त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करून.उपचार सुरू करण्यात आले. पण त्याच्या तब्बेतीत सुधारणा होत नव्हती. एक्सरे, सोनोग्राफी केल्यानंतर सोमवारला रात्रौ ८ वाजे च्या दरम्यान त्याच्या पोटाचे ऑपरेशन कारण्यात आले. मात्र त्याला वेदनाच होत होत्या. अखेर सोमवारच्या रात्रौ २ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला.

त्याच्या जाण्यामुळे सोनापुर गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्याच्या पश्चात आई, दोन बहिणी असा  बराच मोठा आप्त परिवार आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button