जाहिरात
सावली

सावली येथील मक्केवार कुटुंबीयांचे खा.अशोकजी नेते यांनी आर्थिक मदत देऊन केले सांत्वन

Spread the love

सावली (दिं.३ सप्टेंबर)

सावली येथील श्री.अंकुश मक्केवार यांची मुलगी काजल अंकुश मक्केवार वय १३ वर्ष वर्ग पाचवी मध्ये चांदाळा या ठिकाणी शिकत होती.सुट्टीच्या वेळी आपल्या स्वभावी आली असता असोलामेंढा या प्रकल्प नहराच्या पाटामध्ये पोहतांना अचानक काजलचा भाऊ पाण्यात बुडाल्याने तिने भावाचा जीव वाचवण्यासाठी गेली असता पाण्याचा अंदाज न आल्याने तिचा बुडून अंत झाला.यामध्ये तिच्या भावंडासह पाच मुले होती पण चार मुलांना वाचवण्यात यश आले.पण आपल्या भावाला वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात टाकल्याने परिसरात सर्वत्र हडहड व्यक्त केले.

याबाबतची माहिती मिळताच या क्षेत्राचे लोकप्रिय खा.अशोकजी नेते यांनी मृतकाच्या परिवारांची घरी जाऊन आर्थिक मदत देऊन परीवारांचे सांत्वन केले.

तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना शासनाकडून मिळणारी मदत तात्काळ मिळवण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी तातडीने मदत देण्याचे निर्देश खा.अशोकजी नेते यांनी नायब तहसीलदार यांना सूचना केल्या.

याप्रसंगी खा.अशोकजी नेते. तालुकाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अविनाश पाल,महामंत्री तथा नगरसेवक सतीशजी बोमावार,शहराध्यक्ष आशिष कार्लेकर, ठाणेदार बोरकर साहेब, नायब तहसीलदार कांबडी साहेब, प्रसाद जकुलवार, मयूर गुरनुले,अंकुश मक्केवार,मधुकर मेडपलीवार,संजय मेडपलीवार,पर्वताबाई मक्केवार शांताबाई तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button