धक्कादायक- वडिलांनीच स्वतःच्या दोन चिमुकल्या मुलांना विष पाजून हत्या करत स्वतः केली आत्महत्या
वरोरा तालुक्यातील घटना
प्रतिनिधी प्रवीण वाघे,(दि,३ सप्टेंबर)
वरोरा शहरा लगत बोर्डा या गावांमध्ये कांबळे परिवार राहत असून संजय श्रीराम कांबळे हे शिकवणी वर्ग घेण्याचे काम करत होते. गेल्या काही दिवसापासून मानसिक परिस्थिती ढासळल्याने शिकवणी वर्ग सुद्धा बंद करण्याच्या मार्गावर आले होते. त्यांची पत्नी कॉलेजमध्ये कंत्राटी बेस वर काम करत असून संसार सुरळीत चालला होता.
मात्र या सुखी संसाराला वडिलांची नजर लागली . दोन्ही मुलांना सुमित संजय कांबळे ७ वर्ष, मुलगी मिस्त्री संजय कांबळे ३ वर्ष, या दोघांनाही राहत्या घरी विष देऊन हत्या करण्यात आली. यानंतर मुलाची आई घरी आल्यानंतर दार उघडून पाहताच दोन्ही मुले बेडवर पडून असल्याचे दिसतात आईने आरडाओरडा सुरू केला . लगेच दोन्ही मुलांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तोपर्यंत दोन्ही मुलाची प्राणज्योत मावळली होती. या हत्ते मागील कारण अजून पर्यंत कळले नाही. कुटुंबातील परिवारावर शोक कळा पसरली असून प्राथमिक अंदाजानुसार विष पाजून व मुलांचा गळा आवळून हत्या केली असल्याचा अंदाज वरोरा येथील उप रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केला जात आहे.
या घटनेने परिसरात स्मशान शांतता पसरली असून वरोरा पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी कसून शर्यतीते प्रयत्न चालु केले होते. अखेर पोलीसा॓ना यश आल आरोपी मुला॓चा बाप हा वर्धा जिल्यात समुद्रपुर जवळ साखरा गावाजवळच्या शेतशिवारात म्रुत अवस्थेत आढळुन आला.आरोपीने सुद्धा स्वतः विष प्राषन केल्याचा अंदाज दर्शविण्यात येत आहे.पुढील तपास पोलीस करीत आहे. या घटनेमुळे जिल्यात एकच खळबळ उडाली आहे.
