आरमोरी
उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव भू येथे ७५ वा अमृत महोत्सव दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न
आरमोरी (दि,१८ऑगष्ट)
उच्च प्राथमिक जिल्हा परिषद शाळा डोंगरगाव भू येथे ७५ व्या अमृत महोत्सव दिना निमित्त ३ दिवसीय कार्यक्रम घेण्यात आले होते त्याच कार्यक्रमाची समारोपीय १७/०८/२०२२ घेण्यात आले.

चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम, भाषण स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या.

मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले या कार्यक्रमाला उपस्थित गावच्या सरपंच छायाताई खरकटे ,उपसरपंच लोमेशजी सहारे, निखिलजी धार्मिक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तसेच सोमनकर सर उच्च प्राथमिक शाळा मुख्याध्यापक डोंगरगाव येथील ग्रामपंचायत चे सर्व सदस्य गण व शाळा व्यवस्थापन समितीचे संपूर्ण सदस्य गण शाळा डोंगरगाव भुसावळ येथील संपूर्ण शिक्षक आणि शिक्षिका आणि गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते .
जाहिरात
