जाहिरात
गडचिरोली

18 एप्रिल रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन..

Spread the love

गडचिरोली..समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्याच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी /अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनासाठी शासनाने महिला लोकशाही दिवस साजरा करणे करीता सुचित केले आहे.जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारला आयोजित करण्यात येते. या महिन्यात महिला लोकशाही दिन दिनांक 18 एप्रिल 2022, रोज (सोमवार) सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या दालनात आयोजित करण्यात येत आहे. या महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक,आस्थापना विषयक बाबी असे प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडून तक्रार,निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असतील अशा महिलांचे अर्ज प्रत्येक महिण्याच्या तिसऱ्या सोमवारच्या 15 दिवसापूर्वी विहीत नमुण्यात असलेले अर्ज दोन प्रतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे स्विकारण्यात येईल.
जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनामध्ये तक्रार अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गडचिरोली, बॅरेक क्र.1 खोली क्र.26 व 27,कलेक्टर कॉम्प्लेक्स गडचिरोली या कार्यालयात निशुल्क उपलब्ध आहे असे महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button