प्रतिनिधी-प्रवीन वाघे, (दि,५ऑगष्ट)
शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात लोकशाहीची जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने लोककल्याण शिक्षण मंडळ नेरी व्दारे संचालित जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नेरी येथे प्राचार्य एस एन येरणे यांच्या मार्गदर्शनात शालेय मंत्रिमंडळाची स्थापना करण्यात आली.
निवडणूक आयुक्त म्हणून माधव पिसे , उपायुक्त म्हणून बमनोटे मॅडम , निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून गराटे, झोनल अधिकारी म्हणून वर्धलवार तर व्हिडीओग्राफी चित्रीकरण संदेश पंधरे यांनी केले तथा सर्व वर्ग शिक्षक, शिक्षिका यांनी काम पाहिले. निवडणुकीसाठी महल्ले सर ( केंद्रप्रमुख), रमेश बोलधने शाळा व्य स सावरकर सर केंद्र शाळा मुख्याध्यापक तथा पालक वर्गानी भेट दिली ( निवडणूक अधिकारी क्र. १ ), बोदेले ( निवडणूक अधिकारी क्र. २ ) बांबोळे ( निवडणूक अधिकारी क्र. ३)चौधरी ( निवडणूक अधिकारी क्र ४) प्रमोद पिसे यांनी काम पाहिले. मुख्यमंत्री म्हणून लंकेश जीवतोडे तर , उपमुख्यमंत्री म्हणून कु विद्या कामडी हे निवडून आले. त्यानंतर त्यांनी पदाची शपथ घेतली. त्यानंतर शालेय शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री, सांस्कृतिक मंत्री, पर्यावरण मंत्री, क्रीडा मंत्री आदींची निवड करून मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली. प्राचार्य एस एन येरणे यांनी नवनियुक्त शालेय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच सर्व मंत्र्यांचे स्वागत केले. संचालन माधव पिसे व आभार जीवतोडे मॅडम यांनी केले.