गडचिरोली येथे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे जिल्हा स्तरीय जन संपर्क कार्यालय स्थापन करणार
जिल्हाध्यक्ष विजय खरवडे
गडचिरोली (दि,५ऑगष्ट)
गडचिरोली जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला शहरी भागा पासुन तर ग्रामीण भागा पर्यंत त्यांचे न्यायहक्का करीता गाव,तालुका व जिल्ह्यातील ग्राम पंचायत,पंचायत समिती,पोलीस स्टेशन,तहसिल कार्यालय,कृषी विभाग,वनविभाग,जिल्हा परीषद, जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य सर्व कार्यालयात संबधीत नागरीकाना जावे लागतं परंतू अनेक कार्यालयात नागरीकांच्या निवेदनाची वेळेवर दखल घेतल्या जात नाही ज्या मुळे नागरीकाना एकाच कामा करीता त्या त्या विभागाच्या कार्यालयात हेलपाटे मारावे लागते .
दप्तर दिरंगाईचा कायदा असुन प्रत्येक शासकीय कार्यालयात दप्तर दिरंगाई केली जाते.त्या मुळे नागरीकाना मन:स्ताप सहन करावा लागतो. अनेकाना आर्थिक,शारीरीक व मानसीक ञास होत असतो. अशा वेळी शासन,प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी वर्गा कडून सर्वसामान्य जनतेवर जनतेच्या न्यायीक कामा करीता कोणत्याही प्रकारचा उर्मटपणा किवा कसलाही ञास होऊ नये.लोकशाही राज्यात जनता मालक आहे कर्मचारी अधिकारी जनतेचे नोकर आहेत व लोक प्रतीनिधी हे जनतेचे विश्वस्त आहे.याची जाणीव सर्वाना व्हायला हवी.तेव्हा अनेक कार्यालयात नागरीकाची सनद याचे फलक लावलेले नाहीत.माहिती अधिकार कायद्याचे फलक लावलेले नाहीत.काही कर्मचारी,अधिकारी सामान्य नागरीकाना धमकावून बोलताना दिसतात तेव्हा मनमर्जीपणा,अधिकारशाही किंवा हुकूमशाही कदापीही खपवून घेणार नाही अशा जनतेतून तक्रार आल्यास संबधीतावर वरीष्ठ अधिका-या कडून कायदेशीर कार्यवाहीस भाग पाडणार.
या करीता गडचिरोली जिल्ह्यात अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे जिल्हा स्तरीय कार्यालय स्थापन करुन प्रत्येक विभागातील शासकीय कार्यालयातील जनतेच्या कामात आडकाठी आणणाऱ्या कर्मचारी,अधिका-या विरोधीत तक्रार स्वीकारुन त्या तक्रारीची सत्यता जाणुन दोषी कर्मचारी अधिका-या विरोधात लोकशाहीच्या मार्गाने तिव्र आवाज उठविल्या जाणार व वेळ प्रसंगी आंदोलने केले जातील. कारण जनतेचे कामे न करणा-या कर्मचारी अधिका-यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होताना दिसत नाही.त्यांची साखळी मजबूत असल्याचे दिसुन येत आहे.लोकप्रतीनिधीचे हवे त्या प्रमाणात प्रशासकीय यंञनेवर वचक राहीलेला नाही.या उलट अनेक कार्यालया मोठमोठे फलक लावून नागरीकानी कर्मचारी अधिका-याना असभ्यतेची वागणूक देणे,जोराने बोलने,बळजबरी कार्याात प्रवेश करणे,या व अन्य बाबीवर विविध कलमा अंतर्गत होणारी दंडात्मक कार्यवाहीचे फलक लावलेले आहे.तेव्हा नागरीका मध्ये भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे. या नंतर असं होऊ नये या करीता सर्वसामान्य जनतेच्या हित जोपासता यावे. त्यांचे प्रत्येक विभागातील कामे वेळीच पुर्ण व्हावेत या जिल्हाधिकारी याना तसा निवेदन सादर करुन येत्या महीनाभरात गडचिरोली येथे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे जन संपर्क कार्यालय स्थापन करणार असल्याचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष विजय खरवडे यांनी सांगीतले. सदर कार्यालयात प्रत्येकाच्या तक्रारीचे निवारन करण्यात येणार असेही जिल्हाध्यक्ष विजय खरवडे म्हणाले.
