जाहिरात
गडचिरोलीनक्षली घडामोडी

२ लाख इनामी जहाल महीला नक्षली मुडे हिडमा मडावी गडचिरोली पोलीसांच्या ताब्यात

Spread the love

गडचिरोली (दि,४ ऑगष्ट)

२८ जुलै ते ०३ ऑगस्ट नक्षलवादी शहीद सप्ताह साजरा करीत असतात या पार्श्वभुमीवर नक्षलवाद्यांकडुन सरकारविरोधी कार्यक्रम राबवुन हिंसक कारवाया घडवुन आणत असतात. अशा नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांवर आळा घालण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने नक्षलविरोधी अभियान तिव्र केले असुन, पोस्टे, उपपोस्टे व पोमके मार्फत जिल्हयाच्या विविध भागात नाकाबंदी करण्यात आलेली आहे. दि. ०३/०८/२०२२ रोजी पोलीस उपविभाग एटापल्ली अंतर्गत पोस्टे एटापल्ली येथील पोलीस स्टॉफनी नाकाबंदी केली असता, एक महीला संशयीतरित्या मिळुन आल्याने जवानांनी महीला पोलीसांमार्फत तिची अधिक चौकशी केली असता तिने सोबत बाळगलेल्या साहीत्यावरुन ती जहाल महीला नक्षली मुडे हिडमा मडावी कसनसूर दलम सदस्य असल्याचे समजले. त्यावरुन जवानांनी तिला ताब्यात घेवून अटक केली आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. सोमय मुंडे सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख सा., पोलीस अधीक्षक अहेरी श्री. अनुज तारे सा. यांचे नेतृत्वात करण्यात आली.
अटक करण्यात आलेली जहाल महीला नक्षली ही कसनसूर दलममध्ये सदस्य पदावर कार्यरत असुन ती छत्तिसगड राज्यातील सुकमा जिल्हयातील रहीवासी आहे. तिच्या नक्षली कारवाया व नक्षली प्रसारास आळा घालण्याकरीता महाराष्ट्र शासनाने तिचेवर ०२ लक्ष रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते. तिचा किती गुन्ह्यांमध्ये सहभाग आहे याचा तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहे.

सदरची कारवाई करणाऱ्या जवानांचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. यांनी कौतुक केले असुन, नक्षलवादयांनी नक्षलवादाची हिंसक वाट सोडुन आत्मसमर्पण करून सन्मानाने जीवन जगण्याचे आवाहन केले आहे.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button