कर्करोग तपासणी वाहन आपल्या दारी

लोकशाही न्युज,गडचिरोली (दि.२ एप्रिल)
जिल्ह्यात आतापर्यंत १६६१ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे त्यापैकी मुख कर्करोग ४८, स्तन कर्करोग १२, गर्भाशयमुख कर्करोग २२ संशयित रुग्ण मिळाले आहेत. त्यांचेवर पुढील तपासण्या करून तात्काळ औषधोपचार तसेच शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ प्रताप शिंदे यांनी सांगितले.
दि. ४ फेब्रुवारी २००५ पासून सुरु झालेल्या कर्करोग जनजागृती व तपासणी मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्यामध्ये दिनांक २२ मार्च ते ३० एप्रिल २०२५ या कालावधीत कर्करोग तपासणी वाहन संपूर्ण जिल्यामध्ये फिरणार आहे.
या वाहना मध्ये गर्भाशयमुखाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग व मुखाचा कर्करोग इत्यादी तपासणी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत करण्यात येणार आहे.
सुहास गाडे
मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. गडचिरोली
!!!
३० वर्षावरील जास्तीत जास्त लोकांनी या आपल्या तपासण्या करून कर्करोग मुक्त जीवन जगावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
कॅन्सर व्हॅनचा फिरता कार्यक्रम
!!!
चामोर्शी २४ मार्च ते २७ मार्च,
मुलचेरा २८ मार्च,एटापल्ली १ एप्रिल ते ३ एप्रिल,भामरागड ४, ५ एप्रिल,अहेरी ७, ८ एप्रिल, सिरोंचा ९ ते ११ एप्रिल,
आरमोरी १५ ते १६ एप्रिल,
वडसा १७ ते १९ एप्रिल,
कुरखेडा २१ ते २२ एप्रिल,
कोरची २३ ते २४ एप्रिल,
धानोरा २५ ते २६ एप्रिल
गडचिरोली २८ ते ३० एप्रिल असा असणार आहे.
