जाहिरात
आरमोरीगडचिरोली

नालीमध्ये पडून फसलेल्या त्या गाईच्या वासराला युवारंग च्या सदस्यांनी दिले जीवनदान.

Spread the love

आरमोरी :- दि. ८ एप्रिल २०२२ ला दुपारी १:०० वाजता शहरातील पालोरा रोड वरील भारत गॅस च्या ऑफिस समोरील नव्याने बांधकाम झालेल्या नालीमध्ये एक गाईचे वासरू पडून नालीमध्ये गंभीररीत्या फसलेले होते ही बाब युवारंग चे सदस्य गोपालभाऊ नारनवरे यांना लक्षात आली त्यांनी त्वरित ही बाब युवारंग चे अध्यक्ष मा. राहूलजी जुवारे यांना सुचवली तेव्हा कुठलाही विलंब न करता युवारंग च्या सदस्यांना त्वरित कॉल करून घटनास्थळी एकत्रित करून गंभीररीत्या नालीमध्ये पळून फसलेल्या गाईच्या वासराला दोराच्या सहाय्याने बाहेर काढून सोडण्यात आले त्याप्रसंगी युवारंग चे कोषाध्यक्ष मा.प्रफुलजी खापरे , युवारंग चे सदस्य विशाल जंजालकर, रोहित नैताम , प्रशांत सोरते ,गोपाल नारनवरे प्रफुल मोगरे व वार्डातील नागरिक उपस्थित होते .

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button