जाहिरात
गडचिरोली पोलीस

तरुणीचा खून करून फरार झालेल्या आरोपीचा गडचिरोली पोलीसांना शोध लावण्यात आले यश..

Spread the love

दिनांक ०४/०४/२०२२ रोजी सायंकाळी मौजा मन्नेराजाराम येथील गावकन्यांनी मन्नेराजाराम गेर्राटोला येथील शेतशिवारातील नाल्यात प्रेत पुरुन ठेवले असल्याची माहीती उपपोलीस स्टेशन दामरंचा येथे फोनद्वारे कळविले त्यावरुन उप पोलीस ठाणे दामरंचा येथील पोलीस पथक घटनास्थळावर रवाना होवून मा. अनमोल कांबळे कार्यकारी दंडाधिकारी भामरागड यांचे समझ सदरचे प्रेत उकरुन काढले. उप पोलीस ठाणे दामरंचा येथे मौजा मन्नेराजाराम (गेर्राटोला) येथील कु. मिना येर्रा सिडाम ही मिसिंग असल्याबाबत तक्रार दाखल होती. सदरचे प्रेत हे कु. मिना येर्रा सिडाम हीचे असल्याचे तिचे वडील नामे येर्रा सिडाम यांनी ओळखले. त्यावरून उप पोलीस ठाणे दामरंचा येथे अप.क्र.०३/२०२२ कलम ३०२, २०१ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे अविनाश रंगा महावी हा प्रेत पुरल्याची माहिती गावकऱ्यांना मिळताच फरार झाला होता.

त्यावरून संशयीत आरोपीचा शोध घेत असतांना दि. ०८/०४/२०२२ रोजी उप पोलीस ठाणे दामरंचा येथील प्रभारी अधिकारी सचिन घोडके यांचे गोपनिय बातमीदाराकडून सदरचा संशयीत आरोपी हा करीमनगर (तेलंगाणा राज्य) येथील अशोक नगर येथे लपून बसल्याची माहिती मिळाल्याने मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री समीर शेख सा. मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री सोमय मुंडे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री अनुज तारे सा. व उपविभागीय पोलीस अधिकारीच जिमलगट्टा श्री. सुजित कुमार क्षीरसागर यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी पोउपनि सचिन घोडके, पोउपनि राजेंद्र कपले. पोअं/ प्रशांत गरफडे, पोअं/ सुजित कुमार शिखरे, पोों श्रीहरी बड़े, असे पोलीस पथक करीमनगर येथे रवाना होवून सदरचे संशयीत आरोपी नामे अविनाश रंगा मडावी यास ताब्यात घेवून सदर घटनेचाबत विचारपूस केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यावरून आरोपी नामे अविनाश रंगा महावी यास सदर गुन्ह्यात अटक करून पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राजेंद्र कपले करीत आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button