जाहिरात
गडचिरोली

विहीरगाव येथील हातभट्टीवर धाड,७५ हजारांचा मुद्देमाल नष्ट

Spread the love

गडचिरोली (२५जुलै)
तालुक्यातील विहीरगाव जंगल परिसरात हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची माहिती मिळताच गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरित्या धाड टाकून ७५ हजारांचा मुद्देमाल नष्ट केल्याची कारवाई केली.
विहिरगाव जंगलपरिसरात अवैधरित्या हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. प्राप्त माहितीच्या आधारे जंगलपरिसरात शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान, पोलिसांना बघून घटनास्थळावरून दारूविक्रेत्यांनी पळ काढला. यावेळी घटनास्थळावर सहा क्विंटल मोहफुलाचा सडवा, ५० लिटर दारू व साहित्य असा एकूण ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध विक्रेत्यांमध्ये
खळबळ निर्माण झाली आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवदास दुर्गे, दिलीप बावनकर व मुक्तीपथ तालुका संघटक अमोल वाकुडकर यांनी केली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button