जाहिरात
गडचिरोली

गुरवळा येथे कन्या वन समृद्धी योजनेअंतर्गत रोपे वाटप

Spread the love

गडचिरोली(दि २५ जुलै)

वनपरीक्षेत्र अधिकारी, सामाजिक वनिकरण व ग्रामपंचायत गुरवळा यांच्या मार्फत रोपे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते..

कार्यक्रमासाठी अध्यक्षा म्हणून सौ. दर्शना भोपये, सरपंच, गुरवळा व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. सोनल भडके, मा. सहाय्यक वनसंरक्षक, गडचिरोली वनविभाग हे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी सामाजिक वनिकरन विभागामार्फत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कन्या वनसमृद्धी योजने अंतर्गत मागील वर्षात ज्या कुटुंबात मुलगी जन्माला आली त्या कुटूंबातील पाल्यांना शासनामार्फत फळझाडे/बांबू/साग/इतर प्रजाती अशा १० रोपांचे वाटप केले जाते. भविष्यात या झाडांपासून मिळणारे उत्पन्न हे त्या मुलीच्या शिक्षणासाठी तसेच इतर आवश्यक खर्च भागविण्यासाठी उपयोगी होतील. गुरवळा संयुक्त समिती मार्फत गावचा विकास करण्यासाठी कटीबद्ध असल्याबाबत श्री. सोनल भडके सर यांनी यावेळी प्रतिपादन केले..
या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने गुरवळा ग्रामपंचायतचे उपसरपंच, श्री. प्रकाश बांबोळे, वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष, श्री. निलकंठ गेडाम तसेच ग्रामपंचायत सदस्य श्री. चंद्रकांत भोयर व विलास अडेंगवार उपस्थित होते.

श्री. धीरज ढेंबरे, वनक्षेत्रपाल, सामाजिक वनिकरण, गडचिरोली यांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून सदर योजना राबविण्यासाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वनपाल श्री. निलकंठ वासेकर यांनी विशेष प्रयत्न केले.

या कार्यक्रमासाठी सामाजिक वनिकरन परीक्षेत्र गडचिरोलीच्या वनपाल कु. विद्या उइके, व वनरक्षक कु. मेश्राम मॅडम तसेच अमित भुरले, जनार्दन तुंकलवार हे उपस्थित होते..

कार्यक्रमाची सांगता वनरक्षक कु. शितल खुळसंगे, यांनी उपस्थितांचे तसेच ग्रामपंचायत गुरवळा व लाभार्थ्यांचे आभार मानून केली.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button