जाहिरात
गडचिरोलीराजकीय

विज दरवाढ विरोधात ” आप ” उतरणार रस्त्यावर

१३ ला आंदोलन सहभागी होण्याचे आवाहन

Spread the love

गडचिरोली ( दि ११जुलै)
आम आदमी पार्टी गडचिरोली येथिल कार्यकर्त्यांनी स्थानिक वैभव हाॅटेल येथे एक बैठक घेतली. या बैठकीत सर्वानूमते विजदरवाढ विरोधात राज्यव्यापी आंदोलन यशस्वी करण्याचे ठरविण्यात आले आहे. महागाईमुळे होरपळलेल्या महाराष्ट्रात नव्याने सत्तेवर असलेल्या सरकारने विजेच्या दरात भरमसाठ वाढ करुन मोठा आर्थिक झटका दिला आहे. राज्य सरकारच्या या जनविरोधी निर्णयाच्या विरोधात आम आदमी पार्टिने बुधवार दिनांक १३/७/२०२२ रोजी ठिक १२:०० वाजता इंदीरा गांधी चौक गडचिरोली येथे राज्यव्यापी आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत येणारे सरकार जनतेला खोटे आश्वासन देत आहे. मात्र आम आदमी पार्टी दिल्ली पंजाब मध्ये जनतेच्या आश्वासनाची पूर्तता करत असून जनतेला २०० युनिट प्रति महिना वीज मोफत देत आहे. त्यामूळे दिल्लीतील ७२% जनतेला विज बिल शुन्य येते. तसेच पंजाब मधील जनतेला १ जुलै २०२२ पासून ३०० युनिट वीज मोफत देन्याचे आश्वासन पूर्ण केले आहे.
परंतू महाराष्ट्रात सरकारला अडीच रुपय युनिटला मिळणारी विज १० ते १५ रुपये युनिट विकणारे सावकारी सरकार आहे. आता या सावकारी सरकारच्या विजदरवाढ विरोधात आम आदमी पार्टीने कंबर कसली आहे. सर्व आम जनतेला आवहान करण्यात येत आहे की दिनांक १३/७/२०२२ रोजी जनहितार्थ आंदोलनामध्ये बहुसंख्येने सहभागी होऊन विज दरवाढीचा विरोध करावा. या बैठकीला खालील प्रमाणे पदाधिकारी हजर होते.
जिल्हा संयोजक बाळकृष्ण सावसाकडे, जिल्हा सचिव भास्कर इंगळे, शहर संयोजक कैलास शर्मा,शहर सह संयोजक रुपेश सावसाकडे,शहर कमेठी सचिव संतोष कोटकर, संयोजक अलका गजबे,शहर महिला संयोजक समिता गेडाम, महिला सचिव मिनाक्षी खरवडे, युवा सयोजक सोनल नन्नावरे,युवा सचिव नामदेव पोले इत्यादी उपस्थित होते.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button