जाहिरात
गडचिरोलीब्रेकिंग न्युजभामरागड

नाल्यात वाहून गेला ट्रक ३ लोकांचे सापडले मृतदेह ३ लोक बेपत्ता

Spread the love

गडचिरोली ,भामरागड ( दि १० जुलै) :

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाने काही भागात पूरस्थिती निर्माण झाली असून  काही मार्ग सुद्धा बंद आहेत. अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ५ ते ६ प्रवासी असणारा एक ट्रक काल ९ जुलै रोजी रात्रो अंदाजे ९:३० ते १० वाजताच्या सुमारास पेरमिली नाल्यावरून वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. आज रविवार १० जुलै रोजी सकाळी त्या ट्रक मध्ये ३ मृतदेह सापडल्याची प्राथमिक माहिती असून स्थानिक SDRF व पथकामार्फत इतरांचा शोध सुरु आहे.
प्रशासनाने आधीच आलापली ते भामरागड १३० D रस्ता पूल वाहून गेल्याने बंद असल्याची माहिती दिली होती.
पण ट्रक चालकाच्या बेजबाबदार वृत्तीने सदर ट्रक नाल्यात वाहून गेला व त्यात ५ ते ६ लोक वाहून गेल्याची घटना घडली .
प्रशासनाला माहिती मिळताच तालुका व गावस्तरावरील यंत्रणा पाहटे पासून सदर घटनेबाबत शोधमोहिम राबवित आहेत.

जाहिरात

चिफ ब्युरो एडिटर

लोकशाही न्यूज लाईव्ह पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्या , जाहिरात व इतर माहिती ही दर्जेदार असतात. आम्ही आपले सुझाव , सूचनांचे स्वागत करतो. राज्यातील पत्रकार बंधू सुद्धा आम्हाला थेट माहिती पुरवू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जाहिरात
Back to top button