ताज्या घडामोडीधानोरा
धानोरा येथे आधार कार्ड सेंटर सुरू करा ,युवा मोर्चाची खासदार अशोक नेते यांच्याकडे मागणी
धानोरा (दि ८ सप्टेंबर)
धानोरा हे तालुक्याचे ठिकाण असून अजून पर्यंत धानोरा येथे कुठल्याच प्रकारचे आधार कार्ड सेंटर सुरू नाही.त्यामुळे तालुक्यातील लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतो. आदिवासी बहुलक्षेत्र असल्यामुळे खूप लोकांना काही समजत नाही व त्यामुळे लोकांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावा लागत आहे. आजच्या युगात आधार कार्ड हा एक मुख्य पुरावा आहे त्यामुळे धानोरा येथे त्वरित आधार कार्ड सेंटर सुरू करण्यात यावे ही विनंती भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा सचिव सारंग साळवे, नगरसेवक संजीव कुंडू, साजन जी गुंडावार, नगरसेवक लंकेश मशाखेत्री, सुभाष धाईत,युवा मोर्चाचे अध्यक्ष घनश्याम मडावी, प्यारेलाल शेंद्रे, राकेश खरवडे,राकेश दास, गणेश भूपतवार,अनिकेत गुरनुले, मदन गुरनुले यांनी केली आहे .

जाहिरात
